कोथरूड मतदारसंघातील सुतारवाडी बस डेपो (सर्वे नं. १२४) येथील २४ मीटर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न
पुणे : कोथरूड मतदारसंघातील सुतारवाडी बस डेपो (सर्वे नं. १२४) येथील २४ मीटर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सुतारवाडीतील या रस्त्यामुळे नागरिकांना दळणवळण अधिक सोयीस्कर होणार असून, या विकासकामामुळे परिसराचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असे मत यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या पाच गुंठे जमिनीचे हस्तांतरण पूर्ण झाले असून, या कामातील अडथळे आता दूर झाले आहेत. यासाठी सहकार्य करणाऱ्या स्थानिक नागरिक व जागा मालकांचे पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले.
या भूमिपूजन कार्यक्रमाला सर्व सुतार कुटुंबीय, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजपा उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, आबा सुतार, शिवम सुतार, सचिन सुतार, राहुल कोकाटे, रोहन कोकाटे, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, मोरेश्वर बालवडकर, सुभाष भोळ, सचिन दळवी, अनिकेत चांधेरे यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.