सांगलीत इव्हिनिंग स्ट्रीटचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न
सांगली : सांगलीतील वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या काळ्या खणीचा विकास करीत येथे आकर्षक इव्हिनिंग स्ट्रीट उभारण्यात आली आहे. या इव्हिनिंग स्ट्रीटचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भव्य लाईट शोचा अनुभव यावेळी पाटील यांनी घेतला.

शहराच्या सौंदर्यात भर घालणारी ही रचना म्हणजे सांगलीकरांसाठी एक नवीन अनुभव… एकप्रकारे रंकाळ्याचे सुंदर प्रतिरूपच साकारण्यात आले असल्याचे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी आमदार सुधीरदादा गाडगीळ, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्यासह सांगलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.