उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांताक्रूज येथील Rev. C. F. Andrews High School मध्ये आयोजित मराठी वकृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांशी साधला संवाद
मुंबई :सांताक्रूज येथील श्री पेजावर मठ, मध्व भवन येथे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन श्री कृष्णाच्या मूर्तीची आरती करून दर्शन घेतले. धर्मिक आणि आध्यात्मिक वातावरणात मन:शांतीचा आणि सकारात्मकतेचा अनुभव मिळाला, असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. दरम्यान Rev. C. F. Andrews High School मध्ये आयोजित मराठी वकृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकौशल्यातील आत्मविश्वास, मराठी भाषेप्रती असलेलं प्रेम आणि जिद्द पाहून मन आनंदित झालं असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना योग्य प्रोत्साहन देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला आमदार पराग आळवणी, शाळेचे शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि ऊर्जा देणाऱ्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला