लोकमान्य सेवा संघ, पार्ले संचलित श्रीधर वासुदेव फाटक ग्रंथसंग्रहालय येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन केली पाहणी
मुंबई : विलेपार्ले (पूर्व) येथे शताब्दी वर्षानिमित्त लोकमान्य सेवा संघ, पार्ले संचलित श्रीधर वासुदेव फाटक ग्रंथसंग्रहालय (श्री वा. फाटक ग्रंथालय) येथे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.
११ मार्च १९२३ रोजी सुरू झालेले हे ऐतिहासिक ग्रंथसंग्रहालय आता आपला १०० वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करत आहे. ग्रंथालयातील समृद्ध ग्रंथसंपदा, वाचनसंस्कृती आणि शताब्दीपर्यंतचा प्रवास याबाबत पाटील यांनी सविस्तर माहिती घेतली. या पवित्र आणि ज्ञानसमृद्ध स्थळाला शताब्दीपूर्तीच्या निमित्ताने भेट देणे हा अत्यंत आनंददायी आणि प्रेरणादायी अनुभव होता, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी आमदार पराग आळवणी, श्री. वा. फाटक ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. विवेक भट, संस्थेचे कार्यवाह अतुल गोखले, संस्थेचे अध्यक्ष मुकुंद चितळे, ग्रंथालयाच्या कार्यवाह डॉ. मेधा लिमये आणि समितीचे सभासद लोकेश भागवत व उपस्थित होते.