उरुण-ईश्वरपुर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी महायुतीचे उमेदवार विश्वनाथबापू डांगे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज केला दाखल
सांगली : उरुण-ईश्वरपुर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी महायुतीचे उमेदवार विश्वनाथबापू डांगे यांनी प्रचंड उत्साह आणि जनसागराच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या महत्त्वपूर्ण क्षणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

आजच्या भव्य रॅलीतून उरुण-ईश्वरपुरच्या जनतेने दाखवलेला विश्वास पाहता, आगामी निवडणुकीत भाजपा-महायुतीचे उमेदवार निश्चितच विजयी होतील, असा दृढ विश्वास वाटतो, असे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत, आ. सत्यजीत देशमुख, भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी आमदार भगवान साळुंखे, विक्रम पाटील, पृथ्वीराज पवार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव बापू पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निशिकांत पाटील यांच्यासह महायुतीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.