‘नेक्स्ट इन डिझाईन फ्युचर” – UAF’ या एक्स्पोमुळे महाराष्ट्रातील तरुणांना सर्जनशीलता, नवकल्पना आणि करिअरच्या नव्या दिशा मिळतील – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विलेपार्ले (मुंबई) येथे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते डिझाईन क्षेत्रातील भविष्यातील संधींना वाव देण्यासाठी आयोजित “नेक्स्ट इन डिझाईन फ्युचर” – UAF एक्स्पोचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, आजच्या युगात डिझाईन हे ‘आर्ट’पेक्षा अधिक ‘सायन्स’ झाले आहे. या एक्स्पोमुळे महाराष्ट्रातील तरुणांना सर्जनशीलता, नवकल्पना आणि करिअरच्या नव्या दिशा मिळतील, असा मला विश्वास आहे. डिझाईन क्षेत्रातील वाढत्या संधींना चालना देण्याच्या दिशेने हे आयोजन निश्चितच महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
या कार्यक्रमाला आमदार पराग आळवणी, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलचे अध्यक्ष अरविंद प्रभू, Urmi’s Art Forum चे सह-संस्थापक कोमल उल्लाल, विद्यार्थी, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते.