हनुमाननगर येथे उभारण्यात आलेल्या नव्या भाजी मंडईचे लोकार्पण लकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न
सांगली : सांगली महानगरपालिकेच्या वतीने हनुमाननगर येथे उभारण्यात आलेल्या नव्या भाजी मंडईचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
आधुनिक सुविधा, स्वच्छता आणि सुबक रचना यांसह बांधण्यात आलेली ही भाजी मंडई स्थानिक नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी आमदार सुधीरदादा गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.