माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्या संयोजनातून ‘आयुष्यावर बोलू काही’ कार्यक्रमाचे आयोजन… कार्यक्रमास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
पुणे : माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्या संयोजनातून ‘आयुष्यावर बोलू काही’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी श्री. संदीप खरे आणि श्री. सलील कुलकर्णी यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सलील कुलकर्णी अन संदीप खरे यांचे अफलातून सादरीकरण, रसिक प्रेक्षकांचा त्यांना मिळालेला भरभरून प्रतिसाद आणि आपल्या आवडीच्या गाणी अन कवितांसाठी रसिकांचे येणारे ‘वन्स मोअर’ अशी अगदी मंत्रमुग्ध करुन टाकणारी ‘आयुष्यावर बोलू काही’ची संध्याकाळ अतिशय सुंदर रंगली.
शब्द, स्वर आणि भावनांचा सुंदर संगम घडवणाऱ्या या दोन्ही कलावंतांनी आपल्या कवितांद्वारे आणि संगीताद्वारे असंख्य श्रोत्यांच्या मनाला भिडणारे कलाविष्कार सादर करत अमूल्य योगदान दिले आहे. नात्यांच्या, आयुष्याच्या आणि भावविश्वाच्या छटा सहजपणे मांडण्याची त्यांची कला मराठी संस्कृतीची मोठी संपत्ती आहे. ‘आयुष्यावर बोलू काही’सारख्या कार्यक्रमांतून केवळ कानसेनच तृप्त होत नाहीत, तर आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोनही मिळतो. या दोन्ही कलाकारांना त्यांच्या सृजन प्रवासासाठी मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुभेच्छा दिल्या !
यावेळी धीरज घाटे, राजेश पांडे,आ. हेमंतभाऊ रासने तसेच पुनीत जोशी, उज्वल केसकर, संदीप खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे, सुशील मेंगडे, राजाभाऊ बराटे,राजेश येनपुरे मंजुश्रीताई खर्डेकर, माधुरीताई सहस्त्रबुद्धे, हर्षालीताई माथवड, अल्पनाताई वर्पे, राघवेंद्र मानकर,कुलदीप सावळेकर, डॉ.संदीप बुटाला, लहू बालवडकर व विविध क्षेत्रातील आदी मान्यवर उपस्थित होते तसेच रसिक प्रेक्षकांनी देखील या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.