भाजपा कोथरुड उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर यांच्या संयोजनातून १२ संत, महंत आणि शक्तिपीठांच्या पावन पादुकादर्शन सोहळा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न
पुणे : कोथरुडकरांना देव, भक्ती, परंपरा आणि संस्कृती यांचा अनोखा संगम अनुभवता यावा म्हणून भाजपा कोथरुड उत्तर मंडल अध्यक्ष लहू गजानन बालवडकर यांच्या संयोजनातून दरवर्षी आयोजित केला जाणारा १२ संत, महंत आणि शक्तिपीठांच्या पावन पादुकादर्शन सोहळा यंदाही अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. या दिव्य सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून पावन पादुकांचे दर्शन घेतले.

यावेळी पाटील यांनी सर्व सहभागी भक्तांना शुभेच्छा दिल्या तसेच हा मंगलमय उपक्रम यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल संयोजक लहू बालवडकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

लहू बालवडकर सोशल वेल्फेअरच्या वतीने बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी-सुस-म्हळुंगे येथील भाविकांसाठी सलग पाचव्या वर्षी दोन महत्त्वपूर्ण धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . पहिला सोहळा म्हणजे ‘चेतन्यस्पर्श’ ज्यामध्ये भारतातील १२ संत-महंत व शक्तीपीठांच्या पादुकांचे दर्शन आणि दुसरा सोहळा ‘द्वादश मल्हार दर्शन’ असून, यामध्ये महाराष्ट्रातील व कर्नाटकातील खंडेरायाच्या १२ प्रमुख मंदिरांमधील मल्हार मूर्तीच्या दर्शनाचा अभूतपूर्व सोहळा पुणे शहरात प्रथमच आयोजित करण्यात आला . रविवारी १६ नोव्हेंबर रोजी दिवसभर याचे दर्शन भाविकांसाठी सुरु होते. यासोबतच महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं. भक्ती, सेवा आणि समरसतेचा भाव जपत पुण्यनगरी एक वेगळाच अध्यात्मिक रंग यावेळी पाहायला मिळाला.
या प्रसंगी भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.