उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी संरक्षण मानदंड आणि तक्रार निवारण संदर्भात राज्यस्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
मुंबई : मंत्रालय येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज विद्यार्थी संरक्षण मानदंड आणि तक्रार निवारण संदर्भात राज्यस्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना, तक्रार निवारण प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठीची पुढील पावले तसेच राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थीहिताचे प्रश्न यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
समितीने विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण, विद्यार्थी-अनुकूल वातावरण निर्माण करणे आणि तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी ठोस कार्ययोजना तयार करण्यावर सखोल चर्चा यावेळी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी मिलिंद काळे, एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला यांच्यासह समितीचे सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.