भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश
मुंबई : भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, मुंबई येथे आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मांगोले (ता. शिराळा, जि. सांगली) येथील वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
यांच्यासह श्री शिवाजी ग्रामीण बिगर पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पाटील, व्हाईस चेअरमन शिवाजी पवार, शिवाजी सार्वजनिक मांगोले संस्थेचे संचालक प्रकाश पाटील, माजी मुख्याध्यापक एस.एम. पाटील तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रसंगी सर्वांचे चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक स्वागत करून पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते .