आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील भाजप जिल्हा निवडणूक प्रभारींची महत्वपूर्ण बैठक संपन्न… पुढील रणनीतीचा घेतला सविस्तर आढावा
मुंबई : मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात महाराष्ट्रातील जिल्हा निवडणूक प्रभारींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या बैठकीत संघटनेची सद्यस्थिती, जिल्हानिहाय तयारी आणि पुढील रणनीतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत संघटन अधिक बळकट करणे, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक तयारी वाढविणे आणि निवडणूक प्रक्रियेला गती देण्यासाठी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण बैठकीस भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपाचे राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश , राज्याचे मंत्री व स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्र राज्य निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री गणेश नाईक, मंत्री पंकजाताई मुंडे, यांच्यासह राज्यभरातील भाजपा जिल्हा निवडणूक प्रभारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.