मनसे चित्रपट सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रमेश परदेशी (पिट्याभाई) यांचा भाजपमध्ये प्रवेश… भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले पक्षात स्वागत
मुंबई : भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, मुंबई येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशअध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत मनसे चित्रपट सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रमेश परदेशी (पिट्याभाई), MCOCIA चे अध्यक्ष रवींद्र मानगावे, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा,पुणे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष चेतन धोत्रे, तसेच आनंद कुंदूर, करण सुरवसे, कृणाल कडू, ॲड. अक्षय वाडकर, गजेंद्र परदेशी, ओंकार किराड, अनुराग गड्डम, अनुराग पाटील, प्रसाद भोसले, ऋतिक ननावरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी नव्या सहकाऱ्यांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत करून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांसह भाजपाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
मी लहानपणापासून संघाचा सदस्य आहे. कलाकारांना न्याय देण्यासाठी आणि माझ्यावर जे संघाचे संस्कार आहेत त्यामुळे मी प्रवेश केला आहे. कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आलो आहे, असं रमेश परदेशी यांनी पक्षप्रवेशादरम्यान सांगितलं. परदेशी हे मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि पुण्यातील शाखा अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली चित्रपट सेनेने मराठी चित्रपटसृष्टीत पक्षाची ताकद वाढवली होती. रमेश परदेशी हे ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील पिट्याभाई या भूमिकेमुळे लोकप्रिय झाले.