भाजपाच्या विकासदृष्टी व जनआधारावर आधारित कार्यपद्धतीमुळे भोर नगर परिषदेतील परिवर्तनाचे नवीन पर्व निश्चितच घडून येईल – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : भोर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा आज शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित राहून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भोरचे श्रद्धास्थान श्री वाघजाई माता यांचे दर्शन घेऊन भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या विजयी वाटचालीसाठी आईचे आशीर्वाद घेतले.
भाजपाच्या विकासदृष्टी व जनआधारावर आधारित कार्यपद्धतीमुळे भोर नगर परिषदेतील परिवर्तनाचे नवीन पर्व निश्चितच घडून येईल, असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी भोर नरपरिषद सार्वत्रिक निवडूक २०२५ नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जगताप संजय दत्तात्रय यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार यांना कमळ चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करून भारतीय जनता पक्षाच्या सर्वच्या सर्व जागा जिंकून शहराचा विकास अधिक गतीने करून आपल्या भोर शहराला स्मार्ट सिटी करण्याचा निर्धार यनिमित्ताने सर्वांनी केला.
यावेळी माजी आमदार संग्राम थोपटे, जिल्हाध्यक्ष शेखर वडणे, निवडणूक प्रभारी राजेंद्र आबा शिळीमकर यांच्यासह सर्व उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.