मोदी सरकारच्या योजनांचा लाभ स्थानिक पातळीवर प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी भोर नगर परिषदेतही भाजपाचे सरकार असणे अत्यावश्यक – मंत्री चंद्रकांत पाटील

42

पुणे : भोर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय जगताप तसेच नगरसेवक पदासाठीच्या सर्व २० उमेदवारांच्या प्रचारार्थ आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा पार पडली.

या सभेला संबोधित करताना पाटील म्हणाले, बिहार विधानसभा निवडणुकीत NDA ला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे नितीश कुमार जी पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला मिळालेल्या जनादेशामुळे देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन झाले. देशातील सर्वसामान्य नागरिकांना माननीय मोदीजींच्या नेतृत्वावर आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रचंड विश्वास आहे. देश क्रमांक एक बनावा, भारताचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी मोदीजी सतत प्रयत्नशील आहेत.

पाटील पुढे म्हणाले, मोदी सरकारने नागरिकांसाठी अनेक लोकोपयोगी योजना राबवून त्यांनी सर्वसामान्यांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवला आहे. या सर्व योजनांचा लाभ स्थानिक पातळीवर प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी भोर नगर परिषदेतही भाजपाचे सरकार असणे अत्यावश्यक आहे, हे यावेळी स्पष्टपणे सांगितले. आणि त्यामुळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय जगताप तसेच सर्व २० उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन उपस्थित नागरिकांना केले.

या कार्यक्रमास माजी आमदार संग्राम थोपटे, जिल्हाध्यक्ष शेखर वडणे, निवडणूक प्रभारी राजेंद्र आबा शिळीमकर, वैशाली सणस, गणेश पवार, स्वरदा थोपटे, आकाश कांबळे, बाळासाहेब गरुड यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, नगरपरिषदेचे सर्व उमेदवार आणि असंख्य नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.