नामदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा नेते रणजित हारपुडे व सौ. लक्ष्मी हारपुडे यांच्या संयोजनातून आनंदमयी ‘बालजत्रे’चे आयोजन
पुणे :उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील भाजपा नेते रणजित हारपुडे व सौ. लक्ष्मी हारपुडे यांच्या संयोजनातून बालदिन साजरा करण्यासाठी आनंदमयी ‘बालजत्रे’चे आयोजन करण्यात आले होते. या जत्रेमध्ये चिमुकल्या बालमित्रांनी उत्साहाने विविध उपक्रमांचा मनमुराद आनंद घेतला.
या कार्यक्रमास चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्व छोट्या मित्रांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. हि बलजत्रा ठेवल्याबद्दल पाटील यांनी आयोजकांचे कौतुक केले. पाटील यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद देखील साधला, तसेच लहान मुलांना चॉकलेट वाटप केले.
या प्रसंगी स्वातीताई मोहोळ, दत्ता भगत, कमलाकर भोडेकाका, अनिताताई तलाठी, अश्विनीताई जाधव तसेच भारतीय जनता पार्टीचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.