उरूण-ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आगामी नगर पालिका निवडणुकीत महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा केला निर्धार
सांगली : सांगली जिल्ह्यातील उरूण-ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी नगरसेवक अमित ओसवाल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यासोबतच ईश्वरपूर येथे शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयास देखील त्यांनी भेट दिली.
अमित ओसवाल यांच्या निवासस्थानी पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत अनौपचारिक आणि मनमोकळा संवाद साधला. दरम्यान ईश्वरपूर येथे शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या कार्यकर्त्यांशी अनौपचारिक संवाद साधून, आगामी नगर पालिका निवडणुकीत महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखाने यावेळी व्यक्त केला.

या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, उरुण-ईश्वरपूर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वनाथ बापू डांगे, सांगली महापालिकेचे प्रभारी शेखर इनामदार, राहुल महाडिक, स्वरुपराव पाटील यांच्यासह भाजपा आणि महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.