स्थानिक विकास, सर्वांगीण प्रगती आणि स्थिर प्रशासन यासाठी महायुतीच सक्षम पर्याय – मंत्री चंद्रकांत पाटील
सांगली : ईश्वरपूर येथील प्रवासादरम्यान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कै. हभप चंद्रकांत आबा पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन, त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. आबांनी आयुष्यभर केलेली लोकसेवा आणि अध्यात्मिक कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे असल्याचे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले.
दरम्यान पाटील यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला भरघोस पाठिंबा देण्याचे आवाहन करून, स्थानिक विकास, सर्वांगीण प्रगती आणि स्थिर प्रशासन यासाठी महायुतीच सक्षम पर्याय आहे हे अधोरेखित केले.
यावेळी आमदार सदाभाऊ खोत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, सांगली महापालिका प्रभारी शेखर इनामदार, राहुल महाडिक, स्वरुपराव पाटील यांच्यासह भाजपा आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.