वडगाव नगरपरिषदेतही भाजपा-महायुतीचे शासन आल्यास विकासाची गती अधिक वेगाने वाढेल – मंत्री चंद्रकांत पाटील

13

कोल्हापूर : वडगाव नगरपरिषद निवडणुकीत महायुतीच्या प्रचारार्थ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. देशात आणि राज्यात माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सक्षम सरकार कार्यरत आहे. त्यामुळे वडगाव नगरपरिषदेतही भाजपा-महायुतीचे शासन आल्यास विकासाची गती अधिक वेगाने वाढेल, असा विश्वास व्यक्त करत महायुतीला विजयी करण्याचे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.

कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनसंपर्क वाढवावा, नागरिकांपर्यंत सरकारच्या उपक्रमांची माहिती पोहोचवावी, अशा सूचनाही चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. तसेच काही कार्यकर्त्यांनी आज पक्षात प्रवेश केला असून, त्यांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी खा. धनंजय महाडीक, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गंगा हिरवे, शहराध्यक्ष डॉ. अभय यादव, विजूभाई शाह, राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.