श्री अयोध्या धामावर धर्मध्वजाचे ध्वजारोहण अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न… अयोध्येच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचा हा नव्या युगाचा आरंभ – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : आपल्या देशाची अस्मिता, संस्कृती, सभ्यता आणि परंपरेचे अद्वितीय प्रतीक असलेल्या श्री अयोध्या धामावर धर्मध्वजाचे ध्वजारोहण आज अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडले. पवित्र ध्वजारोहण सोहळा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रा.स्व.संघाचे परमपूज्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते संपन्न झाला. मुंबईतील सिंहगड निवासस्थान येथून मंत्री चंद्रकांत पाटील अयोध्येतील श्रीराम मंदिरावर फडकवण्यात आलेल्या या ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळ्याचा साक्षीदारझाले. अयोध्येच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचा हा नव्या युगाचा आरंभ असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

या धर्मध्वजारोहणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मोठ्या संख्येने साधूसंत उपस्थित होते. रामनगरी सुंदर फुलांनी आज सजली होती. हा ध्वज खूप दुरून दुष्टीस पडतो. यावेळी नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. अयोध्येतील राम मंदिर स्थापनेच्या संघर्षावर त्यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. आज श्रीरामाचा दिव्य प्रताप या ध्वजातून प्रतिष्ठापित झाला आहे. हा केवळ एक ध्वज नाही. हा भारतीय सभ्यतेचा पुनरजागरणचा ध्वज आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

हा ध्वजारोहण म्हणजे मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णतेचे प्रतिक असणार आहे. हा ध्वज खूप दुरून दुष्टीस पडतो. याचा भगवा रंग, त्यावरील सूर्यवंशाची ख्याती, त्यावर शब्द आणि वृक्ष राम राज्याच्या कीर्तीला प्रतिरुपीत करत आहे. हा धर्म ध्वज मंदिराच्या ध्येयाचं प्रतिक आहे. या ध्वजातून दूरनच रामलल्लाच्या भूमीचं दर्शन घडवणार आहे.