नामदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून कोथरूडमध्ये दिव्यांगांचे तपासणी शिबीर… सर्व गरजू नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
पुणे : कोथरूडकरांसाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि भारत विकास परिषद, Michelin, Indo‑French Chamber of Commerce, Fupro, समुत्कर्ष सोशल फाऊंडेशन आणि तार्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त सहयोगातून एक अनोखा आणि समाजहिताचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत अपघातामुळे किंवा अनपेक्षितपणे अपंगत्व आलेल्या व्यक्तींना कृत्रिम अवयव मोफत उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे.
आज संविधान दिनाचे औचित्य साधून कोथरूडमधील अशा व्यक्तींची तपासणी करून त्यांना योग्य ते कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. गरजूंना पुन्हा आपल्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक संसाधने, तसेच सामान्य, परिपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगता यावे यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
या अनुषंगाने आज २६ नोव्हेंबर – संविधान दिनआणि २७ नोव्हेंबर रोजी कोथरूडमधील थरकुडे रुग्णालय येथे सकाळी ०९.३० ते सायं. ०६.०० या वेळेत दिव्यांगांची तपासणी करण्यात येणार आहे. कोथरूडमधील सर्व गरजू नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन पाटील यांनी केले आहे.