गुरु तेग बहादूर यांचा त्याग, शौर्य आणि जाज्वल्य इतिहास प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : पुणे येथे गुरु तेग बहादुर जींच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. तसेच ‘गुरु तेग बहादुर जी’ पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी पाटील यांच्या हस्ते पार पडले.

गुरु तेग बहादूर यांचा त्याग, शौर्य आणि जाज्वल्य इतिहास प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. या पवित्र कार्यासाठी नांदेड मधील अध्यासनाला अधिक सक्षम करू, अशी भावना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला गुरुनानक एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन संतसिंग मोखा, गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंहजी साहनी, सरहद संस्थेचे संजय नहार, शैलेश वाडेकर यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.