सासवड आणि जेजुरी या दोन्ही नगरपरिषदांमध्ये भाजपा महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा – मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
पुणे, २७ नोव्हेंबर : पुणे जिल्ह्यातील सासवड आणि जेजुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवाजी शिक्षण संस्था या प्रतिष्ठित संस्थेतील शिक्षक व प्राध्यापक यांच्यासोबत संवाद साधला.
स्थानिक विकास, शिक्षण क्षेत्रातील गरजा, तसेच उत्तम प्रशासनासाठी आवश्यक असलेल्या पुढील वाटचालीवर विस्तृत चर्चा करत, दोन्ही नगरपरिषदांमध्ये भाजपा महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले.
यावेळी पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे, भाजपा नेते बाबाराजे जाधवराव, गिरीशआप्पा जगताप, नंदकुमार सागर, आनंदभैय्या जगताप यांच्यासह शिक्षक आणि प्राध्यापक उपस्थित होते.