सासवड नगर परिषद निवडणूक प्रचारार्थ आगामी निवडणुकीत भाजपाला भक्कम विजय मिळवून देण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
पुणे : सासवड नगर परिषद निवडणूक प्रचारार्थ मार्गशीर्ष गुरुवार निमित्त आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वामी केंद्रात जाऊन स्वामी समर्थ यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. यासोबतच धान्य पेठेतील शिवालय मंदिरात महादेवाचे तसेच पार्श्वनाथ श्वेतांबर जैन मंदिरात भगवान महावीरांचे मनोभावे दर्शन घेऊन त्यांनी आशीर्वाद घेतले.
स्वामींच्या कृपा व आशिर्वादाने या निवडणुकीत सासवडच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग अधिक मजबूत होईल, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित सर्व माता-भगिनींना मतदानासाठी आवाहन करताच, त्यांनी एकमुखाने भारतीय जनता पक्षालाच विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. हीच आमची ताकद, हीच जनआशीर्वादाची नीती, असे पाटील यांनी म्हटले.
यानंतर धान्य पेठेतील सर्व व्यापाऱ्यांशी संवाद साधत आगामी निवडणुकीत भाजपाला भक्कम विजय मिळवून देण्याचे पाटील यांनी आवाहन केले. व्यापाऱ्यांनी भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह सर्व नगरसेवकांना बहुमताने निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यक्रमाला माजी आमदार मा. संजय जगताप, भाजपा नेते बाबाराजे जाधवराव, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आनंदीकाकी जगताप, तसेच भाजपा उमेदवार मोनिका म्हेत्रे, मयूर चौखंडे, स्मिता जगताप, प्रवीण पवार, स्मिता सुहास जगताप, सोपान रणपिसे यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.