मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोंढवा बु. भागातील मुख्य रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
पुणे : विधान परिषदेचे आमदार योगेश आण्णा टिळेकर यांच्या विकास निधीतून कोंढवा बु. भागातील शत्रुंजय गंगाधाम रस्ता, शत्रुंजय चौक, वीर बाजी पासलकर चौक, महाराणा प्रताप चौक (चोरडिया कॉर्नर) ते VIIT कॉलेज या दोन मुख्य रस्त्यांच्या कामांसाठी २४ कोटींच्या निधीची मंजुरी मिळाली. या कामाचे भूमिपूजन बुधवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पुणेकरांसाठी फेज-२ मधील दोन मार्गिकांना मंजुरी दिल्याबद्दल आनंद व्यक्त करताना चंद्रकांत पाटील यांनी मोदीजींचे आभार मानले. आपल्याला संधी मिळाल्यावर ती जनतेच्या सेवेसाठी वापरायची असते, हे मोदीजींनी शिकवले. २०१४ पासून मोदी सर्वसामान्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी जे काम करत आहेत, त्यामुळे आज देशभरातील नागरिक आनंद व्यक्त करत आहेत. तसेच, केंद्रात आणि राज्यात मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करणारे सरकार आहे, म्हणूनच महापालिकेतही भाजपाचे सरकार असावे, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी आ. योगेश टिळेकर, माजी नगरसेविका रंजनाताई (नानी) टिळेकर, वृषाली कामठे, मनीषा कदम, नगरसेवक वीरसेन जगताप, यांच्यासह इतर मान्यवर आणि भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.