पुरंदरमधील आरोग्य सेवेसंबंधीच्या अडचणींच्या निराकरणासाठी निवडणुकीनंतर प्राधान्याने पाठपुरावा करू – मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

49

पुणे : सासवड आणि जेजुरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुरंदर तालुक्यातील सर्व डॉक्टर तसेच केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी यांच्याशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला.

भाजपाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करताना चंद्रकांत पाटील यांनी, गेल्या काही वर्षांत वैद्यकीय क्षेत्राला मिळालेल्या बळाचा विशेष उल्लेख केला. कोविडनंतर पंतप्रधान मोदीजींनी देशातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी केलेल्या व्यापक उपाययोजना तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मिळणारा मोठा दिलासा यावर विस्तृत चर्चा झाली.

या प्रसंगी कोथरुडमध्ये सुरू असलेल्या विविध आरोग्य उपक्रमांची माहिती देत, पुरंदरमधील आरोग्य सेवेसंबंधीच्या अडचणींच्या निराकरणासाठी निवडणुकीनंतर प्राधान्याने पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही यावेळी पाटील यांनी दिली.

या बैठकित माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे, भाजप नेते बाबाराजे जाधवराव, आनंदभैय्या जगताप, प्रदीप राऊत, प्रियांका जगताप तसेच केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.