सासवडच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाला आपला विश्वास आणि आशीर्वाद द्या – मंत्री चंद्रकांत पाटील

31

सासवड, पुणे : सासवड नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारादरम्यान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सासवडमधील प्रथितयश आणि समाजाभिमुख व्यक्तींची भेट घेतली. दरम्यान महाराष्ट्राचे भूषण, शिवचरित्रकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुरंदर वाड्याला पाटील यांनी भेट दिली.

चंद्रकांत पाटील यांनी प्रचारदरम्यान ऐतिहासिक अशा पुरंदर वाड्याला भेट दिली. यावेळी बाबासाहेबांचे चुलत बंधू आप्पासाहेब पुरंदरे यांच्यासोबत त्यांनी अनौपचारिक संवाद साधला. शिवशाहीरांच्या व्यक्तिमत्वाच्या, कार्याच्या आणि त्यांच्या अपार अभ्यासू दृष्टिकोनाच्या अनेक आठवणींना यावेळी उजाळा मिळाला. या प्रसंगी कौशिक पुरंदरे, प्रसन्न पुरंदरे, संघचालक विजय जगताप, माजी आमदार संजय जगताप, भाजपा नेते बाबाराव जाधवराव यांची उपस्थिती होती.

सासवडमधील प्रथितयश आणि समाजाभिमुख व्यक्तींच्या भेटीदरम्यान पाटील यांनी शहराच्या विकासाबाबत फलदायी चर्चा करताना आगामी निवडणुकीत भाजपाला भक्कम पाठिंबा देण्याची ग्वाही व्यक्त केली. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून सासवडच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाला आपला विश्वास आणि आशीर्वाद देण्याचे आवाहनही पाटील यांनी केले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.