तासगाव नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
सांगली : तासगाव नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या जाहीर सभेस आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संबोधित करताना पाटील यांनी जनतेला सरकारच्या योजनांची माहिती दिली.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दृकश्राव्य माध्यमातून तासगावकरांना नगरपरिषद निवडणुकीत भाजपाला भक्कम साथ देऊन विजयी करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाला अधिक बळकटी देण्यासाठी भाजपाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले.
या सभेस प. मा. संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर उमेदवार, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या चव्हाण-दामुगडे, तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील, उदय भोसले, जिल्हा सरचिटणीस अनिल लोंढे, शिवसेनेचे संजय चव्हाण, रिपाइंचे प्रवीण धेंडे यांच्यासह भाजपाचे सर्व उमेदवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.