नगरपंचायत निवडणुकीत मोदीजी आणि देवेंद्रजींचे हात अधिक बळकट करण्यासाठी भाजपाला भक्कम विजय मिळवून द्या – मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

9

सांगली : आटपाडी नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वातील दूरदृष्टीपूर्ण निर्णयांमुळे आटपाडीच्या विकासाला नवी गती मिळाली आहे. ताकारी–टेंभू सारख्या महत्त्वाकांक्षी योजनांनी दुष्काळग्रस्त भागाची ओळख बदलून टाकली असून विकासाची नवी पहाट येथे उगवली असल्याचे पाटील यावेळी म्हणाले. नगरपंचायत निवडणुकीत मोदीजी आणि देवेंद्रजींचे हात अधिक बळकट करण्यासाठी भाजपाला भक्कम विजय मिळवून देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी नागरिकांना केले.

यावेळी पुजारवाडीचे माजी सरपंच संदिपान पुजारी यांच्यासह असंख्य ग्रामस्थ तसेच सोमनाथ राक्षे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षाची ताकद अधिक भक्कम केली.

या जाहीर सभेला जतचे आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, भाजपा सांगली महापालिका प्रभारी शेखर इनामदार, अमरसिंह देशमुख, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उत्तमराव जाधव, बंडुशेठ कातुरे, ब्रह्मानंद पडळकर, दादासाहेब ऊबाले, संदिपान पुजारी, चंद्रकांत दौंडे, विलास काळे, रिपाइंचे राजेंद्र खरात तसेच सर्व भाजपा उमेदवार आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.