मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जत नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने एकता नगर, ताडमळा आणि मंगळवार पेठ परिसरातील नागरिकांशी साधला संवाद
सांगली : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आहे नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी जत नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने एकता नगर येथील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. तसेच जतमधील ताडमळा आणि मंगळवार पेठ परिसरातील नागरिकांशी देखील प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि विकासाच्या गरजांबाबत चंद्रकांत पाटील यांनी थेट चर्चा केली.

स्थानिक विकास, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणींचा सखोल आढावा घेत, निवडणुकीनंतर या सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला मजबुती देण्यासाठी, यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
या प्रसंगी आ. गोपीचंद पडळकर, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, सांगली जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडीक, महापालिका प्रभारी शेखर इनामदार, आणि जत नगरपालिकेचे भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. रविंद्र अरळी यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.