आगामी निवडणुकीत भाजपाला जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी घरोघरी संपर्क मोहीम अधिक प्रभावीपणे राबवा – मंत्री चंद्रकांत पाटील

37

सांगली : उरुण–ईश्वरपूर नगरपालिका निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ईश्वरपूरमधील व्यापारी बांधवांशी संवाद साधला. तसेच ईश्वरपूर येथे भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय हवलदार यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, निलेश शाह, अरविंद पटेल, गणेश पटेल, राजेंद्र पोरवाल, मनोज गांधी, छगन कोठारी यांच्यासह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्यापारी बांधवांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, व्यापारी बांधवांचा पंतप्रधान मोदीजींवरील प्रचंड विश्वास आणि प्रेम पाहून ऊर्जा मिळाली. वर्षानुवर्षे मिळणाऱ्या त्यांच्या पाठिंब्यामुळे भाजपा अधिक बळकट होत आली आहे. नगरपालिका निवडणुकीतही आपण सर्वजण भाजपाच्या उमेदवारांच्या विजयासाठी ठामपणे उभे राहाल, असा दृढ विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान पाटील यांनी आज भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय हवलदार यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधत, आगामी निवडणुकीत भाजपाला जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी घरोघरी संपर्क मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन केले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.