विटा नगर पंचायत निवडणुकीत भाजपाच्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करा, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
सांगली : विटा नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ गांधीनगर, डॉ. आंबेडकर नगर आणि रेवा नगर भागातील नागरिकांशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. देशातील आणि राज्यातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड विश्वास ठेवत आहे. मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारत घडत आहे, तर देवेंद्रजींच्या कामगिरीमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकासकामे वेगाने पूर्णत्वास जात आहेत, असे पाटील यावेळी म्हणाले.
या प्रगतीला चालना देण्यासाठी आणि मोदीजी व देवेंद्रजींचे हात अधिक बळकट करण्यासाठी विटा नगर पंचायत निवडणुकीत भाजपाच्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी येथील नागरिकांना संबोधित करताना केले.
यावेळी आ. गोपीचंद पडळकर, प्रदेश उपाध्यक्ष व सांगली महापालिका प्रभारी शेखर इनामदार, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिभाताई चोथे यांच्यासह प्रशांत कांबळे, उमाताई जाधव, अजित गायकवाड, शोभा सूर्यवंशी, वैशाली सुतार, अरुण गायकवाड आणि भाजपा-महायुतीचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.