कराड आणि मलकापूर नगरपालिकेतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ कराड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयी संकल्प सभा उत्साहात संपन्न

147

सातारा : कराड आणि मलकापूर नगरपालिकेतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ कराड येथे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयी संकल्प सभा पार पडली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करताच नागरिकांनी एकमुखाने विजयी ललकार दिली.

या सभेसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुलबाबा भोसले, आ. मनोज घोरपडे, भरत पाटील, नरेंद्र पाटील, डॉ. सुरेश भोसले, धैर्यशील कदम, सत्यजितसिंह पाटणकर, रामकृष्ण वेताळ, माजी आमदार आनंदराव पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश संघटन मंत्री मकरंद देशपांडे, कराडच्या माजी नगराध्यक्ष शारदा जाधव, रोहिणी शिंदे, मलकापूरच्या माजी नगराध्यक्ष नीलम येडगे, कराडचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक पावसकर आणि मलकापूरचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार तेजस सोनावले यांच्यासह सर्व भाजपा उमेदवार उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. देशाच्या संविधानाने लोकशाहीत आपल्याला काही अधिकार दिले असल्याचे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी यांना आणि तुम्हाला, मला सुद्धा एकच मत देता येतं. ते एक मत देताना योग्य उमेदवार निवडण्याची जबाबदारी देखील आपल्यावर आहे. या लोकशाहीच्या उत्सवात आपण विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही कमळाची चिंता करा, पुढची पाच वर्षे आम्ही तुमची काळजी घेऊ, असं भावनिक आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी कराडकरांना केलं.

कराड आणि मलकापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले यावेळी दिले. आम्ही प्रत्येक प्रकल्पाला प्राधान्य देऊन कराड-मलकापूरला स्मार्ट आणि मॉडेल सिटी बनवणार आहोत. जलसंपदा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये आमचा विकासाचा रोडमॅप स्पष्ट आहे.

आपल्या कराड नगरपालिका नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार, पावसकर विनायक गजानन (आण्णा) आणि मलकापूर नगरपरिषद नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार तेजस शेखर सोनावले व भाजपच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी आपण सर्वांनी कमळ या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.