भाजपा महिला मोर्चा पुणे शहर सरचिटणीस सौ. स्वाती मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न
पुणे : कोथरूड येथे भाजपा महिला मोर्चा पुणे शहर सरचिटणीस सौ. स्वाती मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ हा खास कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ कोथरूडमधील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी हे कार्यालय एक प्रभावी संपर्क सेतू ठरेल, अशा शुभेच्छा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
सौ. स्वातीताई मोहोळ यांनी होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ हा खास कार्यक्रम अत्यंत उत्साहात आयोजित केला. महिलांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त सहभाग, खेळातील आनंद आणि लकी ड्रॉद्वारे दिलेल्या भेटवस्तूंनी कार्यक्रमात रंगत भरली!