चंद्रपूर येथे स्थापन करण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘स्मार्ट रीडिंग झोन’ या डिजिटल वाचन सुविधेचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न
मुंबई: मंत्रालय येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर येथे स्थापन करण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘स्मार्ट रीडिंग झोन’ (Smart Reading Zone – SRZ) या डिजिटल वाचन सुविधेचा शुभारंभ आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची विशेष उपस्थिती लाभली.

या स्मार्ट रीडिंग झोनमुळे विद्यार्थ्यांना १०,००० पेक्षा अधिक जर्नल्स, संशोधन निबंध, वृत्तपत्रे, मासिके आणि विविध डिजिटल प्रकाशने तेही मोफत आणि अनलिमिटेड स्वरूपात एकाच व्यासपीठावर उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
या प्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक डॉ. प्रमोद नाईक, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, उपसचिव अशोक मांडे, अमोल मुत्याल, प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.