ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा यांच्या निधनाने समाजकारणातील एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा यांचे नुकतेच ९३ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याची सुरुवात राष्ट्रसेवा दलातून केली आणि त्यानंतर ते जयप्रकाश नारायण यांच्यासोबत भूदान चळवळीत सहभागी झाले. त्यांच्या कार्यामध्ये समाज प्रबोधन संस्था आणि समाजवादी पक्षासाठी केलेले कार्य यांचाही समावेश आहे. यांच्या निधनाने समाजकारणातील एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा भावना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा यांच्या निधनाने समाजकारणातील एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे. ‘आपलं घर’मधून त्यांनी दिलेला मायेचा आधार आणि समाजहितासाठीचे त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील. त्यांच्या पवित्र स्मृतींस मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, अशी भावनिक पोस्ट पाटील यांनी केली.
पन्नालाल सुराणा निधनामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे. शालेय जीवनात राष्ट्रसेवा दलात ते दाखल झाले. जयप्रकाश नारायण यांच्या भूदान चळवळीत सक्रिय सहभाग त्यांनी घेतला होता. समाज प्रबोधन संस्था आणि समाजवादी पक्षाच्या कार्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी ‘आपलं घर’ सारख्या संस्थांमधून समाजासाठी त्यांनी महत्वपूर्ण काम केले.