आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहर भाजप कोअर कमिटीची बैठक संपन्न

7

पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हि बैठक पार पडली.

यावेळी विविध संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. शहरातील पक्ष संघटन, निवडणुकीसंदर्भातील आवश्यक तयारी, इच्छुकांकडून अर्ज मागवणे आणि निवडणूक रणनीती याबाबत उपस्थित सहकाऱ्यांशी पाटील यांनी संवाद साधला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक प्रभावी समन्वय, संघटित प्रयत्न आणि तळागाळापर्यंत पोहोचणारी भक्कम कामाची दिशा याबाबत पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

शहर भाजपा संघटन कार्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. शहरात नव्याने तयार करण्यात आलेले प्रभाग, जुन्या व नव्या प्रभागांतील प्रश्न, पक्षाचे त्याठिकाणी असलेले संघटन तसेच निवडणुकीसंबंधीच्या ध्येयधोरणांविषयी चर्चा करण्यात आली. येणारी निवडणूक ही शहराच्या भविष्याची दिशा ठरवणारी असणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यासाठी पूर्ण ताकदीने तयारी करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, खासदार मेधाताई कुलकर्णी, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्यासह सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.