महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील रामगिरी निवासस्थानी संपन्न
नागपूर : महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून म्हणजे ८ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात होत आहे.यानिमित्त अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील रामगिरी निवासस्थानी पार पडला. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री आणि आमदार उपस्थित होते.

येणाऱ्या अधिवेशनात राज्याच्या सर्वांगीण विकासासंबंधी महत्त्वाच्या धोरणांवर, जनकल्याणकारी निर्णयांवर आणि भविष्यातील योजनांवर सखोल व फलदायी चर्चा घडेल, असा विश्वास असल्याचे पाटील यांनी म्हटले.
08 डिसेंबर 2025 पासून नागपूर येथे सुरु होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनाचे कामकाज रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 पर्यंत निश्चित करण्यात आले. शनिवार दि.१३ डिसेंबर आणि रविवार दि.१४ डिसेंबर या सुट्टीच्या दिवशी देखील सभागृहाचे कामकाज सुरु राहील.