रा. स्व. संघाचे स्वयंसेवक स्व. बाळकृष्ण ऊर्फ काका कारखानीस यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा शुभारंभ नामदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न
पुणे : कोथरूड येथे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक स्व. बाळकृष्ण ऊर्फ काका कारखानीस यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा शुभारंभ त्यांच्या कन्या मेधाताई निलाखे आणि शिल्पा भालेराव यांच्या हस्ते वृक्षारोपण करून संपन्न झाला. या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या. तसेच भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी यांच्या सेवा-संवाद कार्यालयास देखील पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.

कारखानीस यांच्या कन्या मेधाताई निलाखे आणि शिल्पा भालेराव यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या कट्ट्याचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे कोथरूडमधील ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येण्यासाठी आणि विरंगुळा मिळवण्यासाठी एक हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे.

प्रभाग क्रमांक २९ मधील नागरिकांच्या सेवेसाठी असलेल्या ‘सेवा व संवाद’ कार्यालयाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पाटील यांनी पुनीत जोशी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, डॉ. संदीप बुटाला, उज्ज्वल केसकर, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, चित्रसेन खिल्लारे, राघवेंद्र बापू मानकर यांच्यासह भाजपाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.