उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत विविध विषयांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
मुंबई : मंत्रालय, मुंबई येथे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत विविध विषयांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
या बैठकीत उच्च शिक्षण व तंत्रशिक्षणाशी संबंधित धोरणात्मक मुद्दे, प्रशासकीय बाबी तसेच विभागाच्या कार्यक्षमतेत अधिक सुधारणा करण्याच्या दृष्टीने सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी विभागाच्या कार्यक्षमतेत अधिक सुधारणा करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षण क्षेत्रातील आव्हाने लक्षात घेऊन पारदर्शक आणि वेगवान प्रशासन राबवणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव अमोल मुत्याल, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.