सांगली महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेना, जनसुराज्य आणि रिपाइंची संयुक्त बैठक संपन्न… निवडणुकीच्या रणनीतीवर सखोल व सकारात्मक चर्चा

13

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. आज सांगलीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, जनसुराज्य शक्ती पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मित्रपक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक अत्यंत महत्त्वाची संयुक्त समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीने आगामी निवडणुकीसाठी विजयाची रणनीती निश्चित केली असून जागावाटपाबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर सखोल व सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी माजी मंत्री सुरेशभाऊ खाडे, आ. सुधीरदादा गाडगीळ, अतुलबाबा भोसले, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, तसेच जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम उपस्थित होते.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या माध्यमातून सक्षम व स्थिर नेतृत्व देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या बैठकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी एकदिलाने निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. सांगलीच्या विकासासाठी आणि महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सर्व मित्रपक्ष एकत्रितपणे जनसंपर्क अभियान राबवणार आहेत. सांगलीत महायुतीच्या या एकत्रित ताकदीमुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.