बोरिवलीत ज्ञानाचा महाकुंभ! मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली ‘ऋषभायन–२’ महोत्सवाला दिली सदिच्छा भेट
मुंबई : बोरिवली येथे आयोजित तीन दिवसीय वैश्विक सांस्कृतिक व वैदिक ज्ञान महोत्सव ‘ऋषभायन–२’ मध्ये आज ज्ञानाचा आणि संस्कृतीचा अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला. या महोत्सवाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. राजा ऋषभ कला संस्कृती प्रदर्शनात सादर कृतींची माहिती यावेळी पाटील यांनी जाणून घेतली.
यावेळी जैनरत्न व्याख्यानवाचस्पति, कविकुलकिरीट, सूरिसार्वभौम पूज्यपाद आचार्यदेव श्रीमद विजयलब्धिसूरीश्वर विरचित “श्री चैत्यवंदनस्तुति चतुर्विंशतिः (जिनेन्द्रावृत्ति सह)” या ग्रंथाचे प्रकाशन केले. तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेनिमित्त ‘ऋषभायन’ या संकल्पनेतून साकार झालेल्या तब्बल ११११ ग्रंथांचे भव्य प्रकाशनही पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
अशा महोत्सवांमुळे भारतीय संस्कृतीचा वारसा आणि ऋषी-मुनींचे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यास मदत होत आहे. बोरिवलीतील हा महोत्सव केवळ धार्मिक नव्हे, तर एक वैचारिक आणि सांस्कृतिक महाकुंभ ठरला आहे.
या प्रसंगी आमदार संजय उपाध्याय, विविध धर्मांचे विद्वान, गुरु, मुनीश्वर तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.