मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून चाकणकर व वांजळे कुटुंबियांचे सांत्वन; पितृनिधनाबद्दल व्यक्त केली सहवेदना
पुणे, २१ डिसेंबर : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे आणि कोथरूड परिसरातील शोकाकुल कुटुंबियांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. भाजपा नेते अतुल चाकणकर आणि ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे यांच्या पितृनिधनाबद्दल पाटील यांनी दोन्ही ठिकाणी जाऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
भाजपा नेते अतुल चाकणकर यांचे वडील दत्तात्रेय (बाबा) चाकणकर यांचे अलीकडेच निधन झाले. आज चंद्रकांत पाटील यांनी धायरी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन बाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दत्तात्रेय बाबांच्या निधनाने चाकणकर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो आणि कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, अशा शब्दांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कोथरूडमधील ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे यांचे वडील ज्ञानोबा (मामा) वांजळे यांचेही काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज महाराजांच्या कर्वेनगर येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी मामांच्या स्मृतींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली. वांजळे कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे सांगत त्यांनी महाराजांचे सांत्वन केले.
या दोन्ही भेटींदरम्यान स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.