पुन्हा भाजपाच नंबर वन! … मतदारांचा विश्वास आणि प्रेमामुळे नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीत भाजपाने जबरदस्त यश मिळवलं – मंत्री चंद्रकांत पाटील

9

पुणे  : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने आपला दबदबा कायम राखला आहे. आज जाहीर झालेल्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाने राज्यात ‘नंबर वन’चे स्थान पटकावत विरोधकांना चारी मुंड्या चित केले आहे. महाराष्ट्राचा महाकौल भाजपालाच मिळाला आहे. मतदारांच्या विश्वास आणि प्रेमामुळे नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीत भाजपाने जबरदस्त यश मिळवलंय, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व, केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांच्या मार्गदर्शनात हे यश मिळालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ह्या यशाचे शिल्पकार असून भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासह अन्य सर्व शिलेदार, असंख्य कार्यकर्त्यांच्या अविरत परिश्रमांनी आम्हाला यश मिळवून दिलय असे पाटील यांनी म्हटले. सर्व विजयी उमेदवारांचं मनापासून अभिनंदन. मतदारांचे आभार मानतानाच त्यांचा भक्कम पाठिंबा नेहमीच आमच्या पाठीशी राहील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीतील यशाची लाट स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत कायम ठेवण्यात भाजपला यश आले आहे. 125 पेक्षा अधिक जागांवर भाजपाचा विजय आणि 1100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून दिले आहेत. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीला कौल दिला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.