महिलांनी समाजात स्वतःची सक्षम व स्वतंत्र ओळख निर्माण करावी, त्यांच्या नेतृत्वगुणांना व आत्मविश्वासाला बळ मिळावे, यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : कोथरूड येथे पुनर्निमाण सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित कुटुंब प्रमुख महिला संवाद कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून माता-भगिनींशी मनमोकळा संवाद साधला. या हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कार्यक्रमात सहभागी होऊन अत्यंत आनंद वाटला असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

महिलांनी समाजात स्वतःची सक्षम व स्वतंत्र ओळख निर्माण करावी, त्यांच्या नेतृत्वगुणांना व आत्मविश्वासाला बळ मिळावे, यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत असे यावेळी पाटील म्हणाले. कोथरुडमध्ये माता-भगिनींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक व सक्षमीकरणाचे उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी भाजपा पुणे शहर महिला मोर्चा अध्यक्षा मनिषाताई लडकत, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष लहू बालवडकर (उत्तर), निलेश कोंढाळकर (मध्य), कुलदीप सावळेकर (दक्षिण), पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, नाना भेलके, शंकरराव मोकाटे तसेच भाजपाचे सर्व पदाधिकारी व माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.