संघटनात्मक एकजूट अन् विजयाचा निर्धार! सांगली महापालिका निवडणुकीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडमध्ये

7

सांगली : सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका क्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची सविस्तर बैठक पार पडली. या बैठकीत संघटनात्मक बांधणी, निवडणूक तयारी तसेच पुढील रणनितीचा सखोल आढावा घेण्यात आला. या बैठकीमुळे सांगलीच्या राजकीय वर्तुळात निवडणुकीचे वारे अधिक वेगाने वाहू लागले असून, भाजपने विजयासाठी कंबर कसली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यावेळी निवडणूक प्रभारी अतुलबाबा भोसले, माजी मंत्री आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी संघटनात्मक एकजूट, नियोजनबद्ध तयारी आणि प्रभावी रणनिती यावर भर देत, पक्ष अधिक सक्षमपणे मैदानात उतरणार असल्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतील यशामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीने महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला मोठी गती दिली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.