गडहिंग्लज नगरपरिषद निवडणूक: भाजपच्या विजयी नगरसेवकांचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अभिनंदन; विकासाचा विश्वास केला व्यक्त

60

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी मिळवलेल्या यशाबद्दल आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व विजयी नगरसेवकांना भेटून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

निवडणूक निकालानंतर बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, जनतेने भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांवर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी मतदारांचे आभार मानतो. विजयी झालेले सर्व नगरसेवक जनतेच्या विश्वासाला पात्र ठरून गडहिंग्लज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नक्कीच प्रभावी योगदान देतील, याची मला खात्री आहे.

या विजयामुळे शहरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मंत्री पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि जनसेवेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या विजयामुळे गडहिंग्लजच्या स्थानिक राजकारणात भाजपची पकड अधिक मजबूत झाली असून, आगामी काळात विकासकामांना मोठी गती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.