दैनिक ‘सकाळ’च्या ९४ व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट घेऊन मनःपूर्वक अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा
पुणे : मराठी पत्रकारितेतील विश्वासार्हतेचा आणि निर्भीड लेखनाचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या दैनिक ‘सकाळ’ या वृत्तपत्राने आपल्या यशस्वी वाटचालीची ९३ वर्षे पूर्ण करून ९४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या औचित्याने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘सकाळ’ कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संपादक आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
या भेटीदरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘सकाळ’ समूहाचे संपादक सम्राट फडणीस, निलेश खरे आणि शितल पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ‘सकाळ’ने गेली नऊ दशके जपलेला सामाजिक बांधिलकीचा वारसा आणि पुणेकरांशी असलेले अढळ नाते याबद्दल गौरवपूर्ण उद्गार काढले. पुढील वाटचालीसाठी या समूहाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.”
सकाळच्या ९४ व्या वर्धापन दिनानिमित्त आज पुणे आणि परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावून शुभेच्छांचा वर्षाव केला. पत्रकारितेचा विश्वासार्ह चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सकाळने ९४ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा उत्सव वाचकांच्या प्रेमळ उपस्थितीने द्विगुणित केला.