स्पर्धा परीक्षेतील यश ही समाजाप्रती मोठी जबाबदारी; कोल्हापुरात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

44

कोल्हापूर : स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे हे केवळ वैयक्तिक यश नसून, या यशासोबतच समाजाप्रती एक मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आली आहे. प्रशासकीय सेवेत काम करताना ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

कोल्हापूर येथे आयोजित विशेष गौरव सोहळ्यात विद्याप्रबोधिनीच्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मंत्री पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांच्या मेहनत, चिकाटी आणि जिद्दीचे मनापासून कौतुक केले. यावेळी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले.

या कार्यक्रमाला विद्याप्रबोधिनीचे पदाधिकारी, शिक्षक, यशस्वी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.