माजी आमदार अशोकराव मोडक यांच्या निधनाने प्रगल्भ विचारवंत व कट्टर हिंदुत्ववादी नेतृत्व हरपले – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीतील प्रगल्भ विचारवंत आणि समाजभान जपणारे ज्येष्ठ नेतृत्व माजी आमदार डॉ. अशोकराव मोडक यांचे निधन. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. गेल्या एक वर्षापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर त्यांच्या प्राणज्योत मावळली असून या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. अशोकराव मोडक यांना ध्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. अशोकराव मोडक यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना पाटील म्हणाले की, माजी आमदार अशोकराव मोडक यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या ओघवत्या वक्तृत्वातून अनेक पिढ्यांवर विचारांचे संस्कार झाले. प्रगल्भ विचारवंत व कट्टर हिंदुत्ववादी नेतृत्व आज हरपले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व शोकाकुल कुटुंबीयांना धैर्य देवो, अशी प्रार्थना पाटील यांनी केली.
मोडक यांनी दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए. आणि राज्यशास्त्रात एम.ए. आणि जेएनयूमधून पीएच.डी. केले. त्यांचा पीएच.डी. विषय भारताला सोव्हिएत आर्थिक मदत होता. यामुळे, त्यांना सोव्हिएत रशियाच्या आर्थिक आणि राजकीय समस्यांवरील तज्ज्ञ मानले जात असे. 2015 मध्ये, भारत सरकारने त्यांना पाच वर्षे राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक पदाने सन्मानित केले. अशोकराव, एक कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले आणि त्यांच्या टीमचे नेते, यांनी विविध विषयांवर संशोधन केले आहे. त्यांनी छत्तीसगडमधील बिलासपूर येथील गुरु घासीदास केंद्रीय विद्यापीठाचे कुलपती म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. ते महाराष्ट्र विधानसभेतील पदवीधर मतदारसंघातून खासदार देखील होते.